Breaking News

मित्राच्या मदतीने प्रवासी महिलेची आर्थिक लूट


संगमनेर / प्रतिनिधी :- तालुक्यातील बोटा येथे जाण्यासाठी निघालेल्या कुरकुटवाडी येथील महिलेला अज्ञात कारचालकांनी नाशिक-पुणे महामार्गाववर संतवाडी फाटा येथे लुटल्याची घटना रविवारी {दि. २८} घडली. कुरकुटवाडी येथील लीला भाऊसाहेब कुरकुटे (वय ४५) यांची मुलगी आळेफाटा येथे रुग्णालयात उपचार घेत आहे. लीलाबाई त्यांच्या मुलीला भेटून आळेफाटा येथून बोटा येथे जाण्यासाठी आळेफाटा चौकात थांबल्या होत्या. त्यावेळी तेथे एक कार येऊन थांबली. तुम्हाला बोटा येथे सोडतो, असे लीलाबाई यांना या कारचालकाने सांगितले. त्यावेळी कारमध्ये तिघेजण बसलेले. दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावरील संतवाडी फाटा येथे ही कार आली असता कारचालकाने कार थांबवली. कारमधील तिघांनी लीलाबाई यांना दमदाटी करून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रूपयांचे दागिने, मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी लीलाबाई यांचे डोळे ओढणीने बांधले. त्यानंतर कार घेऊन तिघांनी पोबारा केला. लीलाबाई यांनी आळेफाटा पोलीस ठाणे गाठून संबंधित तीन चोरट्यांविरोधात फिर्याद दिली. आळेफाटा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.