Breaking News

जामखेडमध्ये गळफास घेवून आत्महत्या महिलेवर प्राणघातक हल्ला करून जीवनयात्रा संपविली

येथील कान्होपात्रा नगर मधील शुभांगी शाहू पवार हिच्या राहत्या घरात नितीन एकनाथ धोंडे (रा. आष्टी) याने प्राणघातक हल्ला करून तिला जबर जखमी केले, त्यानंतर तिच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जिवन यात्रा संपवली.

दि. 21 जानेवारी रोजी पहाटे 5. 30 ते 6 च्या दरम्यान कान्होपात्रानगर मधील शुभांगी शाहू पवार (वय 22) हिच्या दोन मजली घरात मयत नितीन एकनाथ धोंडे (वय 34) याने शुभांगी शाहू पवार हिच्याशी अज्ञात कारणावरून भांडण करून, भांडत असतानाच रागाच्या भरात तिच्या मानेवर, गळ्यावर तसेच पोटात धारधार शस्त्राने वार केले, धारधार शस्त्राचा पोटावरील वार चुकवताना शुभांगीने हाताने धारधार शस्त्र पकडल्यामुळे तिच्या हाताच्या बोटांना गंभीर जखमा झाल्याने ती राहत्या घरातून पहाटेच्या शांत वातावरणात बचावासाठी आक्रोश करत घरातून पळाली, इतर नातेवाईकांचा आश्रय घेऊन बचाव करण्यासाठी गेली असता रागाच्या भरात असणारा नितीन एकनाथ धोंडे याने शुभांगीच्या घरातील दुसर्‍या मजल्यावर जाऊन तेथील असणार्‍या इमारतीच्या गजास साडीचा फास लावून व घरातील सोफ्याचा आधार घेऊन गळफास घेत आत्महत्या केली, या संदर्भात मिळालेल्या माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 06/17/18 प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब पोकळे, नामदेव सहारे, हे करीत असून पो.हे.कॉ. बापू गव्हाणे, ए. व्ही. बडे, पो. कॉ. केकान, अल्ताफ शेख, आदी पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी ताबडतोब भेट देऊन मृत्यूदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे पोस्टमार्टमसाठी पाठवून पोस्ट मार्टमनंतर मयत नितीन एकनाथ धोंडे राहणार ता. आष्टी जि. बीड याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला असुन, यातील गंभीर जखमी शुभांगी पवार हीस प्रथम ग्रामीण रूग्णालय जामखेड व नंतर जिल्हा रूग्णालय अहमदनगर येथे उपचारास पाठवले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते, एकंदरीतच हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असल्याची चर्चा स्थानिक वर्तूळातून होत आहे, मात्र प्रकार काहीही असो, एकाचा जीव गेला असून एक मरण यातना भोगत आहे, झाल्या प्रकारामुळे कान्होपात्रानगर मध्ये एकच सन्नाटा दिसून येत होता.