Breaking News

सुप्यात सुशिक्षित बेरोजगार संपर्क अभियानास प्रारंभ

पारनेर / प्रतिनिधी । 21  :- तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार संपर्क अभियानासंदर्भात चर्चा करण्यासाठी सुप्यातील शासकीय विश्रामगृहावर विविध सामाजिक संघटना, उद्योजक, युवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक रविवार दि. 21 रोजी पार पडली. सुशिक्षित बेरोजगार अभियान घेण्यासाठी फोनद्वारे, सोशल मिडियाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व युवकांनी एकत्र येत तालुक्यातील गंभीर समस्या असलेली सुशिक्षित बेरोजगार विषयावर यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगारांसंदर्भात मत व्यक्त करतांना म्हणाले की, अनेक समस्यांमुळे सुशिक्षित बेरोजगारीमुळे तरूणांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. ग्रामिण भागातील विद्यार्थी शेती करुनच शिक्षण घेत असतात, त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे उद्योग, व्यवसाय, नोकरी यापासून वंचित रहावे लागत आहे. दिवसेंदिवस शिक्षण होऊनही अर्थार्जनाची व्यवस्था नसल्यामुळे एक नैराश्य अनुभवायास मिळत आहे, यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संघटक कैलास लोंढे, सा. कार्यकर्ते शरद पवळे, अभिनव पतसंस्थेचे संचालक बबनराव जगदाळे, मार्गदर्शक राजू म्हस्के , शरद रसाळ, डॉ. गुलाब शेख, दिलीप दिवटे, सुहास शेळके, अविनाश ढोरमले, उद्योजक प्रतापसिंह शिंदे, सचिन शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच विजय पवार, भाऊसाहेब इरोळे, अकबर पठाण, पांडूरंग गाडिलकर, अनिल दिवटे, दत्तात्रय चहाळ यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.