Breaking News

मुलगी असल्याचा अभिमान बाळगा : देवकर


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- आजमितिला मुली सर्वच क्षेत्रांत यशस्वीपणे कामगिरी बजावत आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, वैमानिकपासून ते बस वाहकापर्यंत मुली सेवा देत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. तुमची क्षमता हेच तुमचे सामर्थ्य आहे. या क्षमतेचा पुरेपुर वापर करा. मुलगी असल्याची लाज नाही तर अभिमान बाळगा, असे प्रतिपादन भारताच्या पहिल्या महिला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व मार्गदर्शिका अंजली देवकर यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रिडा स्पर्धेच्या उदघाटप्रसंगी त्या बोलत होत्या. १९४८ साली पुणे-नगर धावलेल्या पहिल्या बसचे प्रथम वाहक लक्ष्मणराव केवटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाव्यवस्थापक माधव काळे, मुख्य कल्याणाधिकारी सतिश उज्जैनकर, उपमहाव्यवस्थापक पठारे, विभाग नियंत्रक नितीन मैंद, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्लराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रकाश भट, प्रभाकर जमधडे, प्रकाश गिरमे, प्राचार्य सुधाकर मलिक, महाराष्ट्र राज्यातील कामगार अधिकारी, जिल्ह्यातील शाखा प्रमुख व आगार व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धमध्ये ३५ जिल्हयातील एकूण ६७५ खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ८१ महिलांचा समावेश आहे. या स्पर्धा दि. २८ ते ३० जानेवारी दरम्यान आत्मा मालिक या शैक्षणिक संस्थेमध्ये पार पडल्या. कामगार कल्याणाधिकारी सतिश उज्जेनकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले. नितीन मैंद यांनी आभार मानले.