राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी अधिक भांडवली गुंतवणूक उभारण्याची परवानगी मिळण्यासह राज्याच्या हिश्श्याची रक्कम उभारताना नाबार्डकडून कमी व्याजदराने वित्त पुरवठा उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली. तसेच मुंबईत नियोजित जागतिक गुंतवणूक परिषदेस उपस्थित राहण्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी श्री.जेटली यांना यावेळी दिले. महाराष्ट्रातील गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबईत 18 ते 20 फेब्रुवारी 2018 या कालावधीत आयोजित पहिल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018' या जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री श्री.जेटली यांनीही या परिषदेस उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी अधिक गुंतवणुकीस परवानगी मिळावी - मुख्यमंत्री
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:00
Rating: 5