पारनेर एस टी आगाराच्या सुरक्षितता मोहीमेस प्रारंभ
उदघाटन प्रसंगी गाडे म्हणाले की , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची प्रवाशी सेवा विश्वासार्ह आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करुन आपली जबाबदारी पार पाडावी. असे आवाहन करण्यात आले. गेल्या काही दिवसात वाहनांची संख्या तिप्पट वाढली असुन रस्त्यावरुन जाणा-या व येणा-या वाहनांचा ताळमेळ पाहुनच वाहन चालवले पाहीजे. चालकांनी रस्त्यांच्या स्थितीचे आकलन केले पाहीजे. वाहन चालवताना डोक्यात विचार नकोत. थांब्यावर वाहने थांबवुन प्रवाश्यांना सेवा दिल्यास विश्वास आहे तो वाढेल. सुरक्षा सप्ताहा पुरती नको तर वर्षभर विना अपघात सेवा करावी.
कोकाटे म्हणाले की , अपघातानंतर चालकांसह गाडीतील प्रवाश्यांची मानसिकता खचलेली असते. अपघातातुन अनर्थ घडल्यास संपूर्ण कुटुंबाला ञास सहन करावा लागतो. ते टाळण्यासाठी विना अपघात सेवा दिली पाहीजे. या कार्यक्रमाला महामंडळाचे कर्मचारी ,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
