Breaking News

राष्ट्रपतींकडून उल्लेखनीय सेवेसाठी जाहीर पोलिस पदक राज्यपालांच्या हस्ते प्रदान


पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या‘राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक' व ‘पोलीस शौर्यपदक’, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकांचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज वितरण झाले.
पोलीस पदक वितरणाचा ‘अलंकरण समारंभ’ राज्यपालांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला. याप्रसंगी गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिन 2015 रोजी घोषित केलेली एक राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक, 12 पोलीस शौर्यपदके, उल्लेखनीय सेवेबद्दल 7 राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 80 पोलीस पदक प्राप्त अधिकारी - कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली.