वडनेरकरांचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यावा - सभापती अजय फटांगरे
सभापती अजय फटांगरे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत जिल्हात मोठ्या प्रमाणात बायोगँस उभारले आहेत. जि.प. त्यासाठी अनुदानही देत आहे. पारनेर तालुक्यासाठी बायोगँसचे ८० चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी वडनेर बु.गावामध्ये आजपर्यत ५१ बायोगँसचे काम पुर्ण झालेले आहे. म्हणजेच या योजनेचा लाभ वडनेर गावाने ७०% घेतला आहे. या योजनेशिवाय अन्यही योजनांचा लाभ वडनेरकरांनी पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे. गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांनीही यासाठी ग्रामस्थांचे मनोबल वाढविलेले आहे. गावात विविध शासकिय योजना गावात राबविल्या बद्दल सरपंच अनिल न-हे यांचा यांचा सत्कारही जिल्हा परिषद व पंचायत समिती तर्फे करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती उमेश परहर, सभापती राहूल झावरे, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सभागृहात विस्तार अधिकारी अभंग, माळी , भोसले , वडनेरचे चेअरमन भागा बाबर, ग्रामसेवक हरिश्चंद्र काळे, ग्रामविकास अधिकारी, पोपट यादव, शरद गायकवाड, दिलीप रासकर, दातीर ग्रामसेवक, यांसह तालुक्यातील विविध गावचे सरपंच व ग्रामसेवक हजर होते.
