पाथर्डी नगरपालिकेवर मनसेचा डफडे वाजत मोर्चा
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेकडे वेळोवेळी लेखी पत्राद्वारे ११मे निवेदन, १८ जुलै रोजी बैठासत्याग्रह, २१ ऑगस्ट आंदोलन, ६ ऑक्टोबर उपोषण केले त्यानंतर नोव्हेंबर मध्ये कामाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनची मंजुरी दिल्यानंतर वर्क ऑर्डर डिसेंबर महिन्यात काढली असून, पाईपलाईनचे खोदकाम १७ डिसेंबर रोजी उद्घाटन केले. मात्र अद्याप या कामाला खोदकामाशिवाय कुठलेही काम केले नाही. उलट खोदकाम करून ठेवल्याने या खड्याचा या परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. तरी त्वरित या कामाची सुरुवात करण्यात यावी. अन्यथा तुम्हाला कुठलीही पुर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आह
निवेदनावर सुभाष घोरपडे,लक्ष्मण डांगे,प्रविण शिरसाठ,लक्ष्मण सोनटक्के,शैलेश शिंदे,पप्पू माने,सुभाष तळेकर,विठ्ठल माने,गोरक्ष गरड,सोहेल पठाण,फिरोज शेख,राजेंद्र तळेकर,अल्ताफ इनामदार,निलेश बिडकर,अल्ताफ शेख,रेहाना पठाण,जायदा इनामदार आदींचा सह्या आहेत
