Breaking News

आपण कोणत्याही परिस्थितीत राजकारणात प्रवेश करणार नाही - सुरेश कलमाडी

पुणे, दि. 31, जानेवारी - आपण कोणत्याही परिस्थितीत राजकारणात प्रवेश करणार नाही. परंतु सामाजिक कार्य चालूच ठेवणार असून जमेल तेवढी जनतेची सेवा करणार आहे, असे मत मीरा सुरेश कलमाडी यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री स्वातंत्र्य सैनिक वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त 31 आ ॅक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान पुणे शहरात 100 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे 1800 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.


या रक्तदान शिबिरात संयोजक आणि कार्यकर्त्यांचा मीरा कलमाडी यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. नितु मांडके सभागृहात खास सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, सदानंद शेट्टी, संजय बालगुडे आदी उपस्थित होते.