Breaking News

श्री क्षेत्र कुणकेश्‍वर सोयी-सुविधांपासून दुर्लक्षित !

सिंधुदुर्ग - गावोगावच्या देवी देवतांच्या साक्षीने आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत 13 फेब्रुवारी 2018 रोजी कोकणकाशी म्हणून संबोधल्या जाणार्‍या श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा होणार आहे. परंतु मंदिर परिसरातल्या विकासकामांकडे प्रशासनाकडून होत असलेला दुर्लक्ष होतोय. अशा परिस्थिती त यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी होत असलेल्या यात्रा नियोजन बैठकांचे मग नेमक फलित काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


दक्षिण कोकणची काशी म्हणून श्री क्षेत्र कुणकेश्‍वरची ख्याती सर्वदूर पसरली आहे. स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि इथल्या निसर्ग सौन्दर्याचा आस्वाद घेण्यासाठी बाराही महिने कुणकेश्‍वर पर्यटकांनी भरलेले असते. परंतु कुणकेश्‍वर मध्ये राहत असलेल्या स्थानिक ग्रामस्थांना आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्याकरीता कुणकेश्‍वरमध्ये येणार्‍या पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोई सुविधा पुरविण्यात शासन आणि प्रशासन कमीच पडत असल्याचे दिसून येत आहे.