’’सबका मालिक एक है’’ महानाट्याची तयारी सुरु
सिंधुदुर्गनगरी, - श्री साईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सबका मालिक एक है या महानाट्याच्या प्रसारासाठी टीम सज्ज झाली आहे. समाजाला नवी दिशा देणारे हे महानाट्य वागदे-कणकवली येथे 2 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. महानाट्यानिमित्ताने कणकवलीत प्रतीशिर्डी अवतरणार आहे. तरुण पिढीला, विद्यार्थ्यांना साईबाबांचे विस्मरण होऊ नये, यासाठी या महानाट्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती संजोजक आणि युवा नेते संदेश पारकर यांनी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. महानाट्य पाहण्यासाठी दररोज सुमारे आठ हजाराहून अधिक प्रेक्षक हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. त्याप्रमाणे व्यवस्था केल्याचे पारकर यांनी सांगितले.
कुडाळ तालुक्याने अध्यात्मिकतेचा वारसा जोपासला आहे. भारत देशातील पहिले साई मंदिर कुडाळ तालुक्यातील कवीलकाटे येथे आहेत.सबका मालिक एक है या महानाट्याचा देश परदेशानंतर 47 वा प्रयोग कणकवलीत होत आहे. प्रेक्षकांच्या सोयीसाठी महानाट्यास्थळी मोजकेच स्टालस उभारण्यात येतील. असे संदेश पारकर यांनी सांगतिले. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांसाठी एसटी बसची व्यवस्था केली आहे. शाळांना तिकीट दरात विशेष सवलत देण्यात येणार आहे. साईबाबांचे पाहिले मंदिर कुडाळला उभारले गेल्याने कु डाळातील साई भक्तांना महानाट्याचे निमंत्रण देण्यासाठी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेतल्याचे पारकर यांनी सांगितले.
या महानाट्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांना मोठ व्यासपीठ मिळणार आहे. सहभागी सर्वांची ऑडिशन घेतली जाणार आहे. महानाट्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्याची शक्यता आहे. शिर्डी संस्थानचे हावरे, खासदार विनायक राउत, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, प्रमोद जठार हे उपस्थित राहणार असल्याच पारकर यांनी सांगितले.
11 जानेवारीला 5 ते 9 या वेळेत भालचंद्र महाराज मठ ते नाट्यस्थळापर्यंत भव्य रली काढण्यात येणार आहे. या महानाट्यात साईबाबांची भूमिका अनिल पालकर हा सिंधुदुर्गचा सुपुत्र करणार आहे, अस पारकर यांनी सांगितले.