Breaking News

प्रसारमाध्यमावरच सर्व भिस्त अवलंबून : पटर्वधन


राहुरी तालुका प्रतिनिधी :- समाजात मोठ्या प्रमाणात बदल होत असताना प्रसारमाध्यमावरच सर्व भिस्त अवलंबून असल्याचे प्रतिपादन मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते रवि पटर्वधन यांनी केले. राहुरी पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील नूतन सरपंच यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पटवर्धन यांनी एकच प्याला व अभी तो मै जवान हुँ या अभिनयातील काही अंश सादर करून आपल्या अभिनयातील यशाचे गमक दाखवून दिले. अध्यक्षस्थानी सभापती मनिषाताई ओहोळ होत्या. जि.प.सदस्य शिवाजी गाडे, उपसभापती रविंद्र आढाव, कारखान्याचे माजी संचालक उत्तमराव म्हसे, पं.स.सदस्य सुरेश बानकर, बाळासाहेब लटके, सचिन भिंगारदे, सुरेश निमसे, पत्रकार संजय कुलकर्णी, अनिल आढाव, गटविकास अधिकारी इशाधिन शेळकंदे, अविनाश ओहोळ आदी उपस्थित होते. यावेळी शिवाजी गाडे, मुखतार सय्यद, सुनिल भुजाडी, राजेंद्र वाडेकर, संजय कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले तर याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवागिरे,तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे,शहराध्यक्ष शरद पाचारणे,सचिव मनोज साळवे सह पत्रकार संघाचे सदस्य होते उपसभापती रविंद्र आढाव यांनी प्रास्तविक केले. जेष्ठ अभिनेते रवि पटवर्धन यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच यांचा सन्मान करण्यात आला.सूत्रसंचालन राजू क्षीरसागर यांनी तर आीार पं.स.सदस्य प्रदीप पवार यांनी मानले.