Breaking News

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.

पालघर : विरारमध्ये स्पाच्या नावाखाली सुरु असलेल्या इंटरनॅशनल हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी या पार्लरमधील थायलंडच्या दोन तरुणींसह मध्य प्रदेशातील एका महिलेला अटक केली आहे. विरार पश्‍चिमेला विराट नगरात असलेल्या थिंग थाँग थाई स्पा अँड सलूनमध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून विरार पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांच्या हाती तीन तरुणी लागल्या. 


त्यातील दोन तरुणी थायलंडच्या नागरिक आहेत. तर, एक महिला मध्य प्रदेशची आहे. या रॅकेटचा पोलिसांनी आता कसून तपास सुरु केला आहे. स्पा मसाजच्या नावाखाली इंटरनॅशनल टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गेल्या आठवड्यात येथून जवळच असलेल्या यशवंत नगरमध्ये एका फ्लॅटमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. याठिकाणी सिनेमा, मॉल, कॅटरिंग, जाहिरात अशा विविध क्षेत्रात काम मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणींची फसवणूक करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे तपासात उजेडात आले होते. यातही मोठी टोळी कार्यरत असल्याची संशय व्यक्त करण्यात आला होता. आता पुढील कारवाईकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.