Breaking News

यंदाचा अर्थसंकल्प सर्वांना खुश करणारा नसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकेत

नवी दिल्ली : येत्या 1 फेबु्रवारीला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात येणार असून, त्या अर्थंसंकल्पाकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा असली, तरी ही आशा खरी ठरण्याची शक्यता नाही. कारण आर्थिक सुधारणांवर भर देणारा हा अर्थंसकल्प असल्याचे संकेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे या अर्थंसकल्पात सर्वांना खुश करणारा नसेल. सरकार आपल्या सुधारणांच्या अजेंडयावर चालणार आहे, म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्थांच्या पाच प्रमुख गटांतुन बाहेर येऊन जगातील एक वेगळी व आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. 


वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत संकेत दिले आहेत. दरम्यान, यावेळी लोकांना खूश करणारा अर्थ संकल्प असेल का? असा प्रश्‍न विचारला असता पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, लोकांना मोफत गोष्टी आणि सूट हवी असते, ही एक धारणा झाली आहे. या प्रश्‍नावर त्यांनी असेही सांगितले की, देशाला पुढे नेणे आणि मजबूत करण्याची गरज आहे? की राजकीय संस्कृती-काँग्रेसच्या संस्कृतीचे अनुसरण करायचे आहे?, हे सर्वात आधी ठरवावे लागेल. पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला प्रामाणिक सरकार हवे आहे. सर्वसामान्य जनतेला सूट किंवा मोफत वस्तू नकोत. ही तुमची (मोफत गोष्टींची इच्छा) कोरी कल्पना आहे. आमच्या सरकारचे निर्णय जनतेच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत.