आपत्ती काळातील खबरदारी संदर्भात राज्यभर जनजागृती अभियान राबविणार - मेधा गाडगीळ
मुंबई, दि. 25, जानेवारी - अग्निसुरक्षा ही काळाची गरज असून त्याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. आपत्ती काळात कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती प्रत्येक नागरिकाला असावी, यासाठी राज्यभर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जनजागृती करण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांनी आज येथे सांगितले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व नागरी संरक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने शेअर मार्केट इमारतीत आयोजित अग्नीसुरक्षा जनजागृती अभियान 2018 च्या कार्यक्रम प्रसंगी श्रीमती गाडगीळ बोलत होत्या. यावेळी नागरी संरक्षण दलाचे संचालक व होमगार्डचे महानिदेशक संजय पांडे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान आदी उपस्थित होते. यावेळी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक शिवाजी बांगड यांनी आग लागल्यावर घ्यावयाची काळजी यासंदर्भात माहिती दिली. तसेच आपत्ती घडल्यावर काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात जवानांनी प्रात्यक्षिके दाखविली.
श्रीमती गाडगीळ म्हणाल्या की, आपत्तीची मुकाबला करण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सदैव तयार आहे. आज अग्निसुरक्षा विषय हा महत्त्वाचा आहे. शॉर्टसर्किट अथवा इतर कारणांमुळे आग लागण्याचे प्रकार घडत असले तरी मानवी निष्काळजीपणामुळे त्याचा परिणाम वाढत जातो. त्यामुळे आग लागल्यानंतर अथवा आपत्ती काळात क ोणती खबरदारी घ्यावी, यासंदर्भात सर्वसामान्यांना माहिती होणे आवश्यक आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत राज्यभर जनजागृती करण्यात येणार आहे.