मुंबई-गोवा महामार्गावर कन्टेनरखाली पादचारी ठार
रत्नागिरी, दि. 25, जानेवारी - मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात लवेल पेट्रोलपंपाजवळ आज संध्याकाळी साडेचार वाजता रस्ता ओलांडताना बोलेरो गाडीने धडक दिल्याने समोरून येणार्या कन्टेनरखाली जाऊन एकाचा मृत्यू झाला. विशाल ओमप्रकाश असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विशाल ओमप्रकाश (वय 20 रा. गौरा- कतरा उत्तर प्रदेश) हा लवेल येथील अथर्व पेट्रोल पंपावर टॅन्करवर क्लिनरचे काम करत होता. आपले काम संपवून विशाल ओमप्रकाश हा समोरील टपरीवर चहा पिण्यासाठी गेला होता. चहा पिऊन कानाला ईअरफोन लावून तो रस्ता ओलांडून येत असताना खेडमार्गे येणार्या अज्ञात बोलेरो गाडीने त्याला धडक दिली. धडक बसल्याने तो फेकला जाऊन चिपळूणकडून येणार्या कन्टेनरच्या (आर.जे. जी. बी 3189) समोरील चाकाखाली जाऊन जागीच गतप्राण झाला. ओमप्रकाश (वय 32 रा. उत्तर प्रदेश) असे कन्टेनरचालकाचे नाव आहे. तो चिपळूणहून मुंबईकडे निघाला होता. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड येथील कळंबणी रुग्णालयात पाठविण्यात आला.