Breaking News

सिंधुभूमी फाउंडेशनचे क्रीडा पुरस्कार जाहीर


सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - देवगड तालुक्यात जामसंडे येथील सन्मित्र मंडळाच्या वतीने आयोजीत आठव्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्यानिमित्त सिंधुभूमी फाउंडेशनचे क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 22 रोजी सायंकाळी 7.30 वाजता पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे नववे वर्ष आहे.
उत्कृष्ट क्रीडा पत्रकार ( प्रिंट मिडीया)- दीपक मधुकर गावकर. गेली 17 वर्षे तरुण भारतमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सावंतवाडीसह ओटवणे, सांगेली, दाणोली, माजगाव आदी अनेक ठिकाणच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसह क्रीडाविषयक उत्कृष्ट वृत्तांकन केले आहे. सावंतवाडी पत्रकार संघाचा आदर्श पुरस्कारही प्राप्त झाल आहे. सिंधुमित्र, अभिनव अनुलोम आदी सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत आहेत. इलेक्ट्रोनिक्स मिडीया- उमेश परब, मूळ हळवल- कणकवली येथील आहेत. दैनिकांमध्ये पत्रकारीतेबरोबरच साम टीव्हीचे जिल्हा प्रति निधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या आपला कोकण लाईव्हमध्ये मुख्य प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत आहेत. विविध स्पर्धांमध्ये सह्भागाबरोबरच उत्कृष्ट समालोचन तसेच ते क्रीडा स्पर्धा आणि चळवळीविषयक उत्कृष्ट वृत्तनिवेदक आहेत.