Breaking News

रणरागिणींनी पकडून दिली 15 हजाराची अवैध दारू !


सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - रणरागिणी बनत दोडामार्ग तालुक्यात कोनाळकट्टा इथल्या महिलांनी अवैध दारूअड्ड्यावर मोर्चा नेत दारुसाठा पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. महिलांना पाहून पळ काढलेल्या दारू विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलांनी पकडून दिलेल्या गोवा बनावटीच्या दारूची किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. विशेष म्हणजे ह्या महिलांनी पुढकार घेवून गेल्या दोन दोन दिवसात तीन दारूअड्ड्यावरील पंधरा हजार रुपयांची अवैध दारू पोलिसांना जप्त करायला लावली आहे, तर तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे.