श्रीरामपूर प्रतिनिधी : येथील थत्ते मैदान, झिरंगेनगरसह शहरातील विविध ठिकाणी अबालवृध्दांनी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला. पतंग उडवत असताना आप्तस्वकीयांना भ्रमणध्वनीवरून शुभेच्छाही दिल्या जात होत्या. मकरसंक्रातीनिमित्त लहान मुलांसह युवकांनी सकाळपासून इमारतीवरील गच्चीवर, रस्त्यावर, मैदानावर आदी ठिकाणी डीजे, लॉउडस्पिकरच्या आवाजात पतंग उडवण्याचा आनंद लुटला. विविध आकर्षक रंगाचे आणि आकाराचे पतंग अवकाशात उडताना दिसत होते. शहरातील मुख्य रस्ता, शवाजी रस्ता, गोंधवनी रस्ता, झिरंगे नगर, पूर्णवाद नगर, सरस्वती कॉलनी, कॅनॉल परिसर वेगवेगळ्या आकर्षक पतंगांनी व्यापला होता. मेनरोड लगतच्या विविध दुकाने, इमारतीवरील टेरेसवर फिल्मी गीतांच्या आवाजात पतंग आकाशात उडवत मकरसंक्रतीचा आंनद लहान मुले व तरुण घेत होते. एकमेकांचे पतंग कापण्याची स्पर्धा युवकांमधे रंगली होती.
अबालवृद्धांनी लुटला पतंग उडविण्याचा आनंद
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:27
Rating: 5