धरणग्रस्त गावांमध्ये विकास कामांचा डोंगर उभा करू : आ. कर्डिले
आ. कर्डिले यांनी बारागाव नांदूर ते राहुरी रस्त्याला मंजूरी प्राप्त करून दिली. तब्बल ४ कोटी १९ लाखांचा निधी यासाठी त्यांनी दिला. याबल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.१५ ते २० वर्षांपासून बारागाव नांदूरसह अन्य ७ ते ८ गावांसाठी पुनर्वसण निधी आणण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाही. परंतु , त्यासाठी नगर, नाशिक, पुणे व मुंबई येथे जाऊन आ. कर्डिले यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. परिणामी पुनर्वसित गावांना झळाळी प्राप्त होण्यासाठी कोट्यवधीचा निधी प्राप्त होत आहे.
याप्रसंगी सरपंच प्रभाकर गाडे, रस्ता कृती समितीचे अध्यक्ष सत्यवान पवार, काशिनाथ वराळे, संदीप उंडे, श्रीराम गाडे, शिवाजी गाडे, रावसाहेब भिंगारदे, पंढरीनाथ पवार, भाऊसाहेब गाडे, विलास गाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी समीर पठाण, जिल्लू पिरजादे, किशोर धिमते, सुनिल पवार, अमजद पिरजादे, विश्वास पवार, बबन ईनामदार, इम्रान देशमुख, भाऊसाहेब गाडे, नवनाथ कोहकडे, अहमद देशमुख, सुलेमान पटेल, सुभाष गोपाळे, यासिन इनामदार, तोहिद पिरजादे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
