बंगळुरूमध्ये बारला लागलेल्या आगीत पाच कर्मचा़र्यांचा मृत्यू
बंगळुरू: बंगळुरूमध्ये बारला लागलेल्या आगीत पाच कर्मचा़र्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास लागलेली आग आटोक्यता आली आहे.
कुंभारा सांघा इमारतीमधील कैलास बारमध्ये ही आग लागली होती. मृतांमध्ये या बारच्या कर्मचा़र्यांचा समावेश आहे. सगळयांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग्निशमन दलाच्या दोन गाडयांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आग लागली त्यावेळी पाचही कर्मचारी बारमध्ये झोपले होते. आगीच्या धुरामुळे त्यांच्या गुदमरून मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.