Breaking News

देशात सत्य दाखवणा़र्‍या पत्रकारांवरही गुन्हे : शत्रुघ्न सिन्हा


नवी दिल्ली : आधारचा गैरवापर आणि प्रशासनाची अकार्यक्षमता मांडणा़र्‍या पत्रकारावर गुन्हे दाखल होत आहेत. हा कोणता न्याय आहे ? आपण बनाना रिपब्लिक सारख्या देशांमध्ये राहतो का ? असा सवाल भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सरकारला विचारला आहे. ‘आधार’च्या माहितीसंचाला गळती लागल्याची बातमी देणा़र्‍या पत्रकारावर गुन्हा दाखल झाल्याने खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला ‘घरचा आहेर’ दिला आहे.‘आधार’बाबतची माहिती अवघ्या 500 रूपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त देणाऱया ट्रिब्यून विरोधात ‘युनिक आयडेंडिफिकेशन ऍथॉरिट ऑफ इंडिया’ने गुन्हा दाखल केला हेता. ‘द ट्रिब्यून’वर्तमानपत्र, संबंधित बातमी देणा़र्‍या पत्रकार रचना खैरा आणि आधारच्या माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी एका निनावी ग्रुपने व्हॉट्सऍपवर खैरा यांना माहिती देणा़र्‍या तिघांचा आरोपींमध्ये समावेश होता. ‘याप्रकरणी भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.