Breaking News

उमरोळी स्थानकात प्रवाशांचा रेल रोको


पालघर, दि. 08, जानेवारी - डहाणू-पनवेल मेमू ट्रेन उमरोळी स्थानकात न थांबवल्याने संतप्त प्रवाशांनी रेल रोको केले. डहाणू-पनवेल मेमू ट्रेन न थांबल्याने प्रवाशांनी त्यामागून येणारी अंधेरी लोकल अडवली. केळवे रोड इथे ही घटना घडली.बराच वेळानंतर संतप्त प्रवाशांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, यामुळे पश्‍चिम मार्गावरच्या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. दरम्यान, हा नेमका प्रकार शामुळे घडला याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.