Breaking News

शिवजन्मोत्सव समिती नाशिक शहर समिती अध्यक्षपदी सुनील बागुल

नाशिक, दि. 28, जानेवारी - सकल मराठा समाज 19 फेब्रुवारी हाच शिवजन्मोत्सव म्हणून साजरा झाला पाहिजेत. म्हणून वरद लक्ष्मी लॉन्स, औरंगाबाद रोड या ठिकाणी नियोजनाची बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत शिवजन्मोत्सव समिती नाशिक शहर समिती अध्यक्ष सुनील बागुल यांची आणि नाशिक ग्रामीण समिती अध्यक्ष आ.अपूर्व हिरे यांची एकमताने निवड करून ठराव करण्यात आला आहेत. सकल मराठा समाज, मराठा संघटना, सर्व पक्षीय मराठा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी प्रतिष्ठान, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


शहर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष सुनील बागुल बोलले की, 19 फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सव एक संस्कृतीच दर्शन, एकोपाच्या संदेश देणारा म्हणून भव्य साजरा करू. ग्रामीण आ णि शहराची एकत्रित सकल मराठा समाज यांची सयूंक्त शिवजन्मोत्सव मिरवणूक शहराच्या मध्यभागातून काढू. पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषा, हत्ती, घोडे याच दर्शन घडवणारी शाहीपद्धतीने साजरी करू. तसेच शहरातील विभागनिहाय बैठका आयोजित करून विभागीय समिती तयार करून त्या समितिचे देखील अध्यक्ष व कमिटी स्थापन करून जबाबदार्‍या देण्यात येणार आहेत.