Breaking News

पिंपरीत दहा जणांवर मोक्कांतर्गत कारवाई

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या दहा जणांच्या टोळीवर पिंपरी पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.स चिन दत्तू नढे (30), अविनाश दत्तू नढे (28) प्रतीक सुरेश वाघेरे (21, रा. पिंपरी) बाबाराव ऊर्फ बाब्या सोमलिंग पाटील (20), विकी शंभूसिंग सुतार (23), बबलू महावीर पाल (30), हितेश ऊर्फ छोट्या दिनेश लिंगायत (30), विजय अरुण नढे (27), राहुल कैलास विश्‍वकर्मा (21) या दहा जणांवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे. 

यामधील एक आरोपी अल्पवयीन आहे.पिंपरी येथे संतोष अशोक कुरावत याच्यावर भरदिवसा गोळीबार केला होता. संतोष कुरावतसोबत असलेल्या भांडणाचा राग मनात धरू न त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला होता. कुरावत हा देखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर मोक्कांतर्गत क ारवाई करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवण्यात आला होता, त्यास मान्यता देण्यात आली आहे.हद्दीतील सराईत गुन्हेगार अमर नानासाहेब चव्हाण (20, रा. इंदिरानगर, चिंचवड) याच्यावर पिंपरी पोलिसांच्या वतीने महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले विरोधी (एमपीडीए) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे