Breaking News

मुकुंदनगर पोलिस चौकीस संगणक भेट


अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिस चौकीच्या कामकाजाला गतीमान करण्यासाठी मुकुंदनगर पोलिस चौकीला या भागातील ज्येष्ठ नागरिक तथा माजी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी शाह निजाम सय्यद यांनी संगणक भेट दिला. भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमाने यांनी या संगणकाचा स्विकार केला. अनेक वर्षापासून बंद असलेली मुकुंदनगर येथील पोलिस चौकी पो.नि. देशमाने यांच्या प्रयत्नाने तर जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या भागातील पोलिस चौकीचे कामकाज उत्तम रित्या व जलद गतीने होण्यासाठी या संगणकाची भेट देण्यात आली असून, ही चौकी पुन्हा बंद न पडण्याची अपेक्षा शाह निजाम सय्यद यांनी व्यक्त केली. यावेळी आरिफ नन्हेमियॉ सय्यद, अ‍ॅड.हाफिज जहागीरदार, अंजूम इनामदार, जिया सय्यद, शेख सर, सलिमभाई, अ‍ॅड.रफिक बेग, हबीब पठाण, असद अशरफ, हरुण शेख, सलिम भंगारवाले आदिंसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.