Breaking News

गौण खनिज पथकाची धाडसी कारवाई

हांगा नदीपात्रात लाखोंचा मुद्देमाल जप्त अहमदनगर जिल्हा गौण खनिज विभागाकडून अवैध वाळू वाहतूक, वाळू उपसा करणार्‍या विरोधात कडक कारवाई केली जात असून पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील हांगा नदीपात्रात 1 पोकलेन मशिन, एक जेसीबी, 1 ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करतांना पकडले . ही कारवाई पहाटे दोन च्या सुमारास करण्यात आली. जिल्हाधिकारी अभय महाजन, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गौण खनिज कर्म अधिकारी संजय बामने यांच्या पथकाने अशोक मासाळ, आशुतोष खेडकर, यांनी मिळालेल्या माहिती नुसार पहाटे 2 वाजता बाबुर्डी येथील हांगा नदी पात्रात रात्री सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, अनधिकृत वाळू असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.