Breaking News

माझी कन्या भाग्यश्री जाणीव जागृती अभियान रथाचे चौंडीत आगमन


जामखेड /ता. प्रतिनिधी :- महिला व बालविकास विभाग अहमदनगर यांच्या माझी कन्या भाग्यश्री जाणीव जागृती अभियान रथाचे चौंडी ता. जामखेड येथे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमादरम्यान माझी कन्या भाग्यश्री या योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले, अहमदनगर जिल्ह्यातील महिला व बालविकास जिल्हा परिषद अ. नगर यांच्या माध्यमातून दि. 12 जानेवारी ते 22 जानेवारी या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये माझी कन्या भाग्यश्री जाणीव जागृती अभियान रथाचे पुर्ण जिल्हाभर, नियोजित ठिकाणी भ्रमण व संचलन करून ठिकठिकाणी या अभियानाची जाणीव करून माझी कन्या भाग्यश्री या शासनाच्या अभियानाची माहिती देण्यात येत आहे, शासनाच्या या उपक्रमा विषय जनतेमध्ये जागृती निर्माण करून बेटी बचाओ बेटी पढाओ, तसेच मुलीच्या जन्माचे घटते प्रमाण या चिंताजनक प्रश्‍नांसंदर्भात राज्यपातळी पासून देश पातळीपर्यंत जागृती व्हावी या उद्देशाने माझी कन्या भाग्यश्री अभियान चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हाभर जागृती करून प्रबोधन करत आहे. या जिल्हा परिषदेच्या अभियानास भरभरून प्रतिसाद मिळत आहे, याच पार्श्‍वभूमीवर दि. 16 रोजी या योजनेच्या जाणीव जागृती अभियानांतर्गत चित्ररथाचे आगमन जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक चौंडी या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी दु.12 वा. आगमन झाले. यावेळी बालविकास प्रकल्प, पंचायत समिती, नगरपरिषद, तसेच जामखेड तालुक्यातील महिला बचत गट व इतर सेवाभावी संस्थासह सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवीका आदींच्या उपस्थितीत चित्र रथाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर चौंडी येथील अहिल्यादेवी सभागृहामध्ये यासंदर्भात कार्यक्रम घेण्यात आला, यादरम्यान माजी कॅबिनेट मंत्री आण्णा डांगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, जामखेडचे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, जि. प. सदस्य सोमनाथ पाचारणे, जामखेड पं. स.चे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सुर्यकांत मोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, मा. सभापती डॉ. भगवान मुरूमकर, नान्नजच्या संरपच डॉ. विद्या मोहळकरसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, उपस्थित मान्यवर आणि जि. प. अध्यक्षा विखे यांनी माझी कन्या भाग्यश्री विषय उपस्थितांना मार्गदर्शन केले, यामध्ये, महिलांनी पुढे होऊन कोणालाही न घाबरता कामे करायला पाहिजे, मुलींनी शिक्षण घेऊन नोकरी करणे गरजेचे आहे. महिला व मुलीने कोणत्याही बाबतीत मागे राहू नये असेही त्या म्हणाल्या.