ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना राबविणार - मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यासाठी सन 2017-18 या वर्षासाठी 25 कोटी रुपये इतका नियतव्यय राखून ठेवला आहे. हा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली असून प्रतिवर्षी साधारणपणे 110 कोटी रुपये याप्रमाणे पुढील चार वर्षामध्ये 440 कोटी रुपयांची तरतुद करुन खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक – खाजगी - भागीदारीतून (PPP) ग्रामपंचायतींचे बांधकाम करण्यात आल्यास तितक्या प्रमाणात निधीची आवश्यकता कमी लागणार आहे.
राज्यातील एकूण 28 हजार 6 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 4 हजार 252 ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नाहीत. या ग्रामपंचायतीपैकी बहुतांश ग्रामपंचायती या लोकसंख्येने लहान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत अथवा दुर्गम भागातील आहेत. केंद्र शासनाच्या ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी मिळणारा निधी सन 2015 - 16 पासून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने स्वनिधीतून ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.
