कोपरगांव प्रतिनिधी :- कोेपरगांवचे भूमिपुत्र आणि वक्तृत्वशैलीवर महाराष्ट्र्र गाजविणारे प्रा. नारायणराव सदाशिव उर्फ ना. स. फरांदे यांच्या निधनामुळे शासन, लोकप्रतिनिधी आणि विरोधक यांच्यातील महत्वाचा दुवा निखळून पडला आहे. संभाषण कौशल्यावर विधानमंडळ गाजविणांरे व्यक्तीमत्व हरपले, अशा शब्दांत संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी फरांदे यांना श्रद्धांजली वाहिली. अध्यक्ष बिपीन कोल्हे, आ. स्नेहलता कोल्हे यांनीही फरांदे यांच्या निधनाबददल शोक व्यक्त केला. कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली होती. विधानसभेचे उपसभापती व त्यानंतर सभापतीपदापर्यंत ते पोहोचले.
ना. स. फरांदे यांना कोपरगावात श्रद्धांजली
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:48
Rating: 5