Breaking News

शिरसगाव येथे शॉर्टसर्किटने ऊस जळाला


श्रीरामपूर प्रतिनिधी : -तालुक्यातील शिरसगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सोपानराव गवारे यांच्या {गट क्र. ८३} शेतातील अडीच एकर ऊस क्षेत्रात विजेच्या शोर्टसर्किटने जळाला. श्रीरामपूर नगरपालिका आणि अशोक सहकारी साखर

कारखान्याच्या अग्निशामक गाड्या वेळेवर पोहोचल्याने आग विझविण्यास मदत झाली. गवारे यांच्या शेजारच्या ग्रामस्थांनी आगीच्या ठिकाणी वेळीच धाव घेतली. कारखाने सुरु असले तरी दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे गवारे यांचा जळालेला हा ऊस बुधवारी तोंडाला जाईल, असे कारखान्याच्यावतीने सांगण्यात आले.