Breaking News

पाथर्डीत पत्रकारावर दाखल झालेला गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे पत्रकारांच्या आक्षेपानंतर पोलीस अधीक्षकांचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाथर्डी येथील पत्रकार अ‍ॅड.हरिहर गर्जे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची सत्यता पडताळूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी पत्रकारांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे केली. या मागणी संदर्भात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, प्रेस क्लब व राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले़.


पत्रकारांनी केलेली मागणी शर्मा यांनी गांभीर्याने घेत या गुन्ह्याचा तपास तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे़ मंगळवारी रात्री पाथर्डी पोलीस ठाण्यात देविदास खेडकर यांनी गर्जे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीसांनी कुठलीही शहानिशा न करता कलम 384 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला़ पाथर्डी तालुक्यात रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करून गर्जे यांनी याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित केल्या होत्या़.

या बाबीचा राग येऊन खेडकर यांनी आकसापोटी गर्जे यांच्या विरोधात खोटी फिर्याद दाखल केली आहे. याकडे पत्रकारांनी अधीक्षकांचे लक्ष्य वेधले़ गर्जे यांच्यावर दाखल झालेल्या गुुन्ह्याचा तपास पाथर्डी पोलीसांकडे न ठेवता इतर अधिकार्‍यांकडे वर्ग करावा तसेच घटनेची सतत्या पडताळूनच पुढील कार्यवाही करावी, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करू नयेत आदी मागण्या यावेळी पत्रकरांनी केल्या.

यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सुदाम देशमुख, सुरेश वाडेकर, अशोक झोटिंग, सागर शिंदे, विक्रम लोखंडे, रोहित वाकळे, सय्यद अन्सार, राजेंद्र त्रिमुखे, गणेश शेंडगे, अशोक परूडे, ज्ञानेश्‍वर शेलार, साजिद शेख, वाजिद शेख, अण्णा नवथर, अरूण वाघमोडे, साहेबराव नरसाळे, नवनाथ खराडे, बाबा जाधव आदी उपस्थित होते़