कर्जत तालुक्यातील निमगांव गांगर्डा येथे योगा शिबीर संपन्न.
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डे येथे २५ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत सिद्धि समाधी योग शिबिराच्या समारोप प्रसंगी गुरुवर्य बलभीम मुळे बोलत होते. याकार्यक्रमास पद्मा मुळे , प्रशिक्षक दत्तात्रय गांगर्डे, प्रभाकर तरटे, संतोष गांगर्डे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, आनंदराव गांगर्डे, अशोकराव ढगे, संतोष लोळगे, संजय ढगे, रामकृष्ण गांगर्डे, मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात मुलांना स्वतः, गुरु व मातापित्याविषयीचा आदरभाव, समाजाविषयी बांधिलकी, चांगले विचार, आचार, व मनुष्यास आवश्यक असणारा चांगला आहार, याविषयी माहिती देवून ही मुले भविष्यात चांगली नागरिक म्हणून कशी जगू शकतील असे प्रशिक्षण देण्यात आले. मुलांना ध्यानधारणा, प्राणायाम , व्यायाम, याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी आपली मुले शिबिरात सहभागी झाल्याने त्यांच्यात कमालीचा बदल झाला असल्याची माहिती पालकांनी दिली आहे
