Breaking News

पारनेर येथे ग्राहक पंचायतची बैठक संपन्न.


पारनेर/प्रतिनिधी /- पारनेर तालुका आखील भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक आयोजीत करण्यात आली होती.ही बैठक शनिवार,13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता ग्राहक पंचायत कार्यालय , हरेश्वर सदन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 

या मासिक बैठकीला अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक पंचायतचे विलास जगदाळे होते. यावेळी ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोकाटे, जिल्हा ग्राहक पंचायतचे शाहुराव औटी, डॉ.श्रीकांत पठारे, अरुण कुलट, पाटीलबा ठाणगे, भगवान ताबे, देवदत्त साळवे, संतोष होन, संतोष अटक, रोहीणी कासार, जालींदर आहेर, बाळासाहेब कोळगे, हरिभाऊ चौधरी, अरुण रोहकले, डॉ.आप्पासाहेब नरोडे, डॉ.बाळासाहेब कावरे, आदि ग्राहक पंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.