शेतकरी कुटुंबाला हवा आहे आधार
शेवगाव तालुक्यातील मौजे वरुर येथील रहिवासी सुनील काकासाहेब शिंदे यांचे दिनांक 24 12 2017 रोजी दोन्ही किडनी निकामी झाल्याने वयाच्या एकतिसाव्या वर्षी निधन झाले. उपचारादरम्यान सुनील चा मृत्यू झाला त्याच्या पश्चात चार वर्षाची मुलगी अक्षता, मुलगा ओम, पत्नी ज्योती, आई-वडील ,कायम आजारापासून अंथरुणाला खिळलेले आजोबा असा परिवार आहे. सध्या या कुटुंबाला मिळकतीचे कोणतेही साधन नाही म्हणून समाजातील विविध सेवाभावी संस्था ट्रस्ट दानशूर व्यक्ती ना मदतीसाठी आव्हान करण्यात येत आहे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या कुटुंबास आपल्या मदतीचा आधार हावा आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भरीव मदत देऊन सांत्वन केले जाते. पण आत्महत्या रोखण्यासाठी केलेली अल्पशी मदत ही बहुमोल ठरेल. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 9404100178वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे