लासलगाव येथे बंदला हिंसक वळण, बसच्या काचा फोडल्या
त्यानंतर बस शिटवर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. तातडीने ही बस लासलगाव बस आगारात पोलिसांनी सुखरूप आणली. तसेच बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद राहिले. बंदमुळे नुकसान होऊ नये म्हणून बसेस बंद ठेवण्यात आल्या व बस आगारात उभ्या आहेत. परंतु लासलगाव बस आगाराची मुक्कामी गेलेली मनमाड लासलगाव बस क्र मांक एमएच 40 - एन 8616 ही सकाळी लासलगाव साडेसहा वाजता लासलगावकडे येत असताना रेल्वे गेटवर काही युवकांनी काचा फोडल्या व या बसमधील वाहक चालक व आठ प्रवासी येत असताना काचा फोडून व पेट्रोल टाकुन बस जाळण्याचा प्रयत्न केला.
