Breaking News

सावदा ,यावल येथे जुगार अड्ड्यावर धाड

जळगाव, दि. 04, जानेवारी - यावलसह सावदा येथे राजरोस चालणा-या जुगार अड्ड्यावर भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व त्यांच्या पथकाने काल रात्री अचानक धाड टाकत 43 जुगारांच्या मुसक्या आवळल्या. दुचाकींसह हजारो रुपयांची रोकड व मोबाईल आदी मिळून लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आल्याने जुगा-यांचे धाबे दणाणले आहे. जळगाव पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर ही धाड टाकण्यात आली.


यावल शहरातील सुदर्शन टॉकीजसमोरील एका घरातून 19 जुगारींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. येथून सट्टा व जुगारांच्या साधनांसह 19 हजार 480 रुपयांची रोकड, 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून एक लाख 14 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.