Breaking News

पतंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रतिनिधी, श्रीरामपूर :- येथील कृषक समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान आणि मोठ्या गटातील सुमारे १५० स्पधर्कांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला. लहान गटात युवराज आगे तर मोठ्या गटात मृन्मय लांडे या दोघांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अतिरिक्त पोलिस अधिक्षक रोहीदास पवार, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, पुष्पलता आदिक, नगरसेविका स्नेहल खोरे, राजेंद्र पवार, संतोष कांबळे, रवी पाटील, ताराचंद रणदिवे, मनोज लबडे, कलीम कुरेशी, डॉ. एन. जी. चौधरी, अर्चना पानसरे आदींच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उत्साहात उदघाटन झाले. यावेळी पवार यांच्या हस्ते हवेत फुगे व पतंग उडवून उद्घाटन पार पडले. स्पर्धेसाठी शालेय व खुला गट असे वर्गीकरण करण्यात आले होते.