Breaking News

वळण पिंप्रीच्या उपसरपंचपदी वैभव जरे


राहुरी तालुका प्रतिनिधी  :- तालुक्यातील वळण पिंप्री ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैभव जरे यांची बिनविरोध निवड झाली. लोकनियुक्त सरपंच सविता राजुभाऊ शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत वैभव जरे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसेवक जी. पी. गांधले यांनी सदर निवडीचे काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भास्कर पंडीत, स्नेहल शेटे, जगू जाधव, सुभाष पवार, रशिदा शेख, सविता कानडे, रोहीदास जरे, दगडू साळवे, रावसाहेब जरे, बाळासाहेब जरे, जालु कानडे, दादा राजळे, शरद कानडे, शरद डुकरे, चांगदेव जरे, राधु जाधव, सदाशिव जरे, ठकसेन जरे, सतिष गोसावी, धनु मोहळकर, चंदु जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.