Breaking News

नॅशनल बॉक्सिंगसाठी श्रद्धा शिंदेची निवड


शेवगाव /प्रतिनिधी - येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयातील इयत्ता 9 वी मध्ये शिकणारी श्रद्धा उदय शिंदे हिने पंजाब येथे 23 ते 25 डिसेंबर दरम्यान अमृतसर येथे खेळल्या गेलेल्या राज्यव्यापी बॉक्सिंग फेडरेशनच्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मुंढे यांनी श्रद्धा हिचा आज शेवगाव येथे सत्कार करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या योगदानामध्ये फिटनेस क्लबचे अभिजित भोसले यांची मोठी मोलाची कामगिरी असल्याचे श्रद्धाने संगितले. तसेच अश्‍विनी चव्हाण यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे श्रद्धाने सांगितले. तिच्या या छोट्याशा सत्काराच्या वेळी आज भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण मुंढे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सरचिटणीस हाजी शेलार, भाजीपाला व्यापारी आघाडीचे राजा लाड्डा, पत्रकार अनिल खैरे, निलेश केवळ, वैभव रोडी, अनिल शिंदे, जनमंगलचे व्यवस्थापक अशोक लबडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्रद्धा हिची राजस्थानमध्ये जयपूर येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे, तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.