Breaking News

देवा ग्रुप च्या वतीने 26 जानेवारीला रॅलीचे आयोजन


शेवगाव /प्रतिनिधी । 21 ः येथील विधायक, शैक्षणिक, सामाजिक व अन्यायाविरूध्द लढणारी संस्था देवा ग्रुपच्या वतीने 26 जानेवारी रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्तादिनाचे औचित्य साधून सकाळी 10 वा. मुंढे चौक, गाडगे चौक, भगतसिंग चौक येथून ही रॅली निघणार आहे, त्याचबरोबर या दिवशी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप देवा ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी यावेळी ग्रुपचे आदेश हिवाळे, अक्षय घोमणे, पप्पू वाघमारे, अंकुश ढाकणे, अमोल तुजारे आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.