Breaking News

स्व.बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमान जागृत करून प्रखर विचाराची शिदोरी दिली: जगताप


नेवासा/ शहर प्रतिनिधी/- शिवरायांचा भगवा झेंडा हाती घेवून स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांमध्ये स्वाभिमान जागृत करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रखर विचाराची शिदोरी दिली. असे वक्तव्य शहर प्रमुख नितीन जगताप यांनी केले .
नेवासा येथील नगर पंचायत चौकात आयोजित स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहर प्रमुख नितीन जगताप बोलत होते. या कार्यक्रमास शिव सहकार चे बालेंद्र पोतदार, माजी तालुका प्रमुख हरिभाऊ शेळके, तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, प्रकाश शेटे, अंबादास लष्करे, युवा सेना तालुका उपप्रमुख अक्षय दाणे, अनिल ताके, गफूर बागवान ह्या मान्यवरांनी स्व. ठाकरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या काळात शिवसैनिकांनी साहेबांच्या ८० % समाजकारण व २० % राजकारण या सूत्रांनुसार सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावे हिच साहेबांना आदरांजली राहिल. यावेळी बालु जिरे, नगरसेवक रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, भास्कर कणगरे, मुन्ना चक्रनारायण, अक्षय दाणे, बाबा लष्करे, दिपक धोत्रे, दिपक इरले, अंबादास इरले, सचिन कदम, बिटु धनवटे, भास्कर कणगरे, जालु गवळी ,निरज नांगरे, रवि रासकर, गहिनीनाथ लष्करे, जमीर देशमुख, आण्णा इरले, बंडू शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते. नगर पंचायत कार्यालय व मारूती चौकात स्व.बाळासाहेब ठाकरेची जयंती साजरी करण्यात आली.-