कर्जतमध्ये दुष्काळ बाधीत शेतकऱ्यांना निधीचे वाटप .
वर्ष 2015 हे तालुक्यासाठी दुष्काळी ठरले. राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांना दुष्काळ मदतनिधी देण्याचे आश्वासन दिले. महसुल प्रशासनाने एैशी हजार पाचशे सहासष्ट खातेदाराची यादी सरकारकडे सादर केली . परंतु ज्याना पीक विम्याचे पैसे मिळाले त्यांना वगळून यादी पाठविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने छत्तीस हजार पाचशे सहासष्ट शेतक-याची यादी सादर केली. त्यामुळे या शेतक-यासाठी राज्य शासनाने चौदा कोटी एक लाख सत्तावन्न हजार सत्तेचाळीस रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आली. या निधीचे वितरण करायचे झाल्यास शेतक-याच्या हातात तुटपुंजे पैसे पडणार आहेत. याविरूध्द शेतक-यानी व विरोधी पक्षानी विधी मंडळाच्या अधिवेशानात आवाज उठविला महसुलमंञी ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी मदतनिधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र वाढीव निधी दिलाच नाही. त्यामुळे चार महिन्यापुर्वी जिल्हा प्रशासनाने तहसिलदारांकडे रक्कम वर्ग करून शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्याचे आदेश दिले .प्रत्यक्षात आता पर्यत 30 ते 35 टक्के शेतक-याच्या खात्यावर निधी वर्ग झाला आहे . ही मदत आगदीच किरकोळ स्वरूपाची आहे. तरीही ती पोहोचण्यास उशीर लागत आहे. असे असले तरी नगर जिल्हयात कर्जत तालुक्याचे काम उजवेच आहे हे नाकरता येणार नाही.
कर्जत तालुक्यातील शेतक-यांना आनुदान वाटप कार्यक्रम चालू असूनही अनेक शेतक-यानी बँकेच्या पासबुकाची झेराँक्स प्रत तलाठ्याकडे जमा केले नाही. त्यांनी त्वरीत जमा करावेत. असे आवाहनही तहसीलदार किरण सावंत पा.यानी दै. लोकमंथनशी बोलताना केले. या शिवाय ग्रामसभेत व गावागावात दवंडी देऊन शेतक-याच्या जागृती करत आहोत. हे आनुदान गहू,हरभरा व ज्वारी याच पिकासाठी दिले जाणार आहे. आनुदान हेक्टरी 3,500/- रुपये प्रमाणे अदा होणार आहे. - तहसीलदार सावंत पा.
