Breaking News

प्रशासकिय कामकाजा विषयी आढावा बैठक संपन्न

पारनेर/प्रतिनिधी /- येथील पंचायत समिती सभागृहामध्ये दि.21 रोजी पारनेर तालुक्यात प्रशासकिय काम काजांच्या राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी खासदार दिलीप गांधी, तहसिलदार भारती सागरे,गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, बाजार समिती स्विकृत सदस्य वसंत चेडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख अश्विनी थोरात,आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या बैठकित शासनाकडुन राबविण्यात येणा-या प्रशासकिय योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रशासकिय विभागातील महसुल,ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम ,वनविभाग, आरोग्य, शिक्षण, बँक या विभागाकडुन सार्वजनिक राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत प्रशासकिय अधिका-यांकडुन होणा-या वेळकाढु पणा बद्दल नाराजी व्यक्त केली. कासारे गावच्या सरपंचानी पाण्याच्या पाईपलाईनचा मुद्दा उपस्थित केला. परंतु संबधित उपअभियंता यांना उत्तरे देता आले नाही. यावर खासदारांनी त्यांना फैलावर घेतले. तर पारनेर नगरपंचायत कडुन शहरात पथदिवे बसविले जात नाही. हा मुद्दा पारनेरचे ग्रामस्त भिमा औटी यांनी उपस्थित केला. 

यावर मुख्याधिकारी परदेशी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर परदेशी म्हणाले की नगरसेवकांच्या जनरल मिटींग मध्ये मंजुर न झाल्याने अडचण येते . यावर खासदारांनी त्यांना स्वत:च्या अधिकार अमलात आणा असा सल्ला दिला. तसेच पारनेरच्या सेंन्ट्रल बँकेला मुद्रा लोन बाबत माहीती विचारण्यात आली. एकुण दहा प्रकरणे करण्यात येतील. यावर खासदारांनी या संबधित अघिका-याला खडेबोल सुनावले. एका फॉर्मवर सुशिक्षित बेरोजगारांना लोन देण्याच्या सुचना करण्यात आल्या. तर तालुक्यातील रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, बंधारे, तलाव, हे मुद्देही प्रकर्षाने घेण्यात आले.