सोलापूर, दि. 31, जानेवारी - विनय सानपच्या अष्टपैलू खेळामुळे मुकबधिराच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने मुंबईवर 238 धावांनी दणदणीत विजय मिळविला. डोणगाव रस्त्यावरील पुष्प अकादमीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फंलदाजी करताना महाराष्ट्राने निर्धारित 40 षटकांत 3 बाद 288 धावा केल्या. यात विनय सानपने (107) शानदार शतक साजरे केले. रत्नदीप धानू (82), सुदीश नायर (नाबाद 42) यांनी संघाच्या धावसंख्या वाढविण्यास साथ दिली. मुंबईच्या सुमीत सदाफुले व अजय रावते यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. विजयी 289 धावांचे लक्ष्य मुंबईला पेलवले नाही. श्याम विश्वकर्मा (15) वगळता त्यांचे अन्य फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. त्यांचा डाव 50 धावांत आटोपला. विनययने 6 धावात चार बळी बाद करीत अष्टपैलू खेळ केला. रत्नदीप धानू व करण विंदे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मूक-बधिरांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने मुंबईला हरवले
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:45
Rating: 5