Breaking News

जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले यांची शाळेस सदिच्छा भेट


अहमदनगर :-  जि. प. च्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मळेगाव ता. शेवगाव या शाळेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाळा खोल्यांची तपासणी केली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, शालेय पोषण आहार याविषयी मुख्याध्यापकांकडून माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यास तसेच खेळामध्ये आधिकाधिक प्रगती कशी साधता येईल याबाबत शिक्षक आणि संबधितांना सूचना देखील केल्या. काही विद्यार्थ्यांना अभ्यासातील प्रश्‍न विचारुन व्यवस्थीत उत्तरे दिल्यानंतर समाधान ही व्यक्त केले. यापुढेही जिल्हा परिषदेच्या अंतर्गत शाळांना व प्राथमिक आरोगी केंद्रांना मी स्वतः अचानक भेटी देणार असून याबाबत कोणतीही पूर्व सूचना देण्यात येणार नाही, त्यामुळे संबधित अधिकारी शिक्षक व कर्मचारी यांनी वेळेनुसार शाळेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचनाही संबधितांना दिल्या.यावेळी पं. स. सदस्य मनिषा कोळगे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, पं. स. सदस्य मंगेश थोरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सहदेव निकम, मुख्याध्यापक निवृत्ती गोरेंसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.