Breaking News

आत्मा मालिकचे ग्रीन एनर्जीचे काम गौरवास्पद - ना. राम शिंदे


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- आत्मा मालिक या संस्थचे अध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम आहे. आत्मा मालिकने नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून सौर उर्जेच्या माध्यमातून ग्रीन एनर्जी तयार करत सामाजिक भावना जोपासली आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्र्यानी उर्जेबाबत जे धोरण स्विकारले आहे, त्याचाच एक भाग म्हणून आत्मा मालिकचे ग्रीन उर्जा निर्मितीचे हे काम आहे. हे काम निश्चितच गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

आत्मा मालिक या संस्थेने उभारलेल्या १८० किलो वॅट क्षमतेच्या सोलर एनर्जी प्लॅंटच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, संत परमानंद महाराज, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त वंसत आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, शैलेश चौगुले, प्राचार्य सुधाकर मलिक, भगवान सुर्यवंशी आदी उपस्थित होते.