Breaking News

नगरसेवक रमेश गोरे हे एक अष्टपैलू नेतृत्व


पाथर्डी/शहर प्रतिनिधी I२६: नगर पालिकेत काम करताना कोणत्या शीर्षाखाली कोणता निधी उपलब्ध होतो, प्रभागातील कोणत्या विकासकामास प्राधान्यक्रम द्यायचा, अविकसित भागाचा शोध घेऊन तेथील उपाययोजना सुचवत त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी अविरत पाठपुरावा करुन त्यांचा छडा लावणारे नगरसेवक रमेश गोरे हे एक अष्टपैलू नेतृत्व असल्याचे वक्तव्य करीत आमदार राजळे यांनी त्यांना शाबासकीची थाप दिली.
पाथर्डी शहरातील खोलेश्वर मंदिर परिसरात, चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून हरितपट्टा विकसित करण्याबाबतीत घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन रमेश गोरे यांनी केले असल्याने आमदार राजळे भारावून गेले, त्यांनी रमेश गोरे यांचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हा उपवनसंरक्षक अे. श्रीलक्ष्मी, जि.प.सदस्य राहुल राजळे, माजी जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, पं.स.चे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, पालिकेचे गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे, प्रसाद आव्हाड, अनिल बोरुडे, नगरसेविका मंगल कोकाटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना राजळे म्हणाल्या, इतर नगरसेवकांनी रमेश गोरेंचा आदर्श घेत आगामी काळात विकासास हातभार लावावा. पाथर्डी शहर आता कात टाकत असून, कोट्यावधी रुपयांची विकासकामे होत आहेत. स्व.राजीव राजळेंनी त्यांच्या हयातीत केलेल्या पाठपुराव्यामुळे, नगरपालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जॉगिंग ट्रॅकसारखे बिग बजेट असलेली कामे पुर्णत्वास येत आहे. सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन सर्व कामांना साकार करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पालिकेतील बांधकाम समितीचे चेअरमन रमेश गोरे यांनी केले.