Breaking News

बहिरोबावाडी-धोत्रे रस्त्यावरील अतिक्रमित भागाची तहसीलदारांकडुन पाहणी !


पारनेर / प्रतिनिधी/- तालुक्यातील बहिरोबावाडी येथील ग्रामस्थांनी बहिरोबावाडी - धोत्रे रस्त्यावरील ३०० मी. वर झालेले अतिक्रमण हटविण्यात यावे. अशी मागणी पारनेरचे तहसीलदार भारती सागरे यांच्याकडे पंधरा दिवसांपूर्वी लेखी निवेदन देऊन केली होती.
त्या पार्श्वभूमीवर सोमवार,२९ जानेवारी रोजी तहसीलदार सागरे यांच्यासह मंडलधिकारी सचिन औटी , शिंदे , तलाठी मसलेकर यांनी बहिरोबावाडी येथील बहिरोबावाडी - धोत्रे रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण भागाची पाहणी केली. या वेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले की , पुढील आठवड्यात सदर रस्त्यावर केलेले अतिक्रमण व रस्त्याच्या दोन्हीं बाजूला असलेली काटेरी झुडुपे काढुन रस्ता मोकळा करण्यात येईल.

या वेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील , किन्हीचे सरपंच बाबासाहेब व्यवहारे , ग्रा.पं.सदस्य आदिनाथ व्यवहारे , पांडुरंग व्यवहारे , विठ्ठल देठे , बबन देठे , नाथा देठे , मल्हारी व्यवहारे , भिकाजी व्यवहारे , पोपट व्यवहारे , सिताराम देठे , नारायण व्यवहारे ,अमोल देठे ,मोहन मोढवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.